Saturday, March 18, 2006

आज फाल्गुन व.द्वितिया! तुकाराम बीज. आजच्याच दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता. पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय. तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते , त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला. समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.)अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते. याची अनेक उदाहरणे देता येतील . एक तुकारामांचं तर आहेच,आणखी दोन उदाहरणं जरा नजीकच्या काळातील देतो- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ! ही दोनीही नेते सध्या संघाचे प्रातःस्मरणीय आहेत. तुकाराम बीजेच्या आजच्या दिवशी आपण अश्या लोकांच्या या धुर्तपणाला थोडंजरी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आजचा दिवस सार्थक होईल.
महाराष्ट्रात काही कुटील लोक व राजकारण्यांनी शिवजयंतीचा वद्कायम चिघळता ठेवल आहे.आजही शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या २-२ जयंत्या साजऱ्या केल्या जाव्यात यासारखा शिवरायांचा दुसरा अपमान तो कोणता? (याशिवाय महाराष्ट्रात शिवजयंती टिळकांनी सुरू केली असाही एक गोड गैरसमज आहे.पण टिळक जेव्हा खरोखरच बाळ होते तेव्हा १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायंची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जिवनावर एक प्रदिर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य घरोघर पोहचावे यासाठी त्यांनी १८७० साली शिवजयंती सुरू केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू झाली.) असो, सध्याचा प्रश्न शिवजयंतीच्या वादाचा आहे.हा वाद संपाव म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चित करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले. ज्या कामाला २-३ वर्ष लागतात तेथे त्यांनी ३०-३३ वर्ष लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता‌. शेवटी त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाल सादर केली. १९ फ़ेब्रुवारी ही तारिख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरतच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली. शासनाच्या समितीत असणारे तथाकथीत शिवशाहीर तिथीच्या कळपात घुसले. शिवजयंतीचा वाद हा कोणत्याही राजकीय पक्षाने सुरू केला नाही, पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी त्या नंतर राजकीय स्वरूप देण्यात आले. यामागे षड् यंत्र काय? या वादतून बहुजन समाजात दोन गट पडावेत, लढण्यातच त्यांची सर्व शक्ती नष्ट व्हावी, खऱ्या शिवचरित्राकडे त्यांचे लक्षच जाऊ नये असा हेतू नसू शकेल काय? जयंत साळगांवकरांना तिथीबद्दल एवढे प्रेम आहे तर मग ते आपले कॅलेंडर चैत्र महिण्यात बाजारात का आणत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे आणि तिथीचे आकडे लहान का टकतात? पण तिथीचा आग्रह धरल की पंचांग आलेच , मग़ साळ्गांवकरांसारख्यांचा रोजगार हमी धंदा आलाच . पंचांग वाचनाचा बिन भांडवली धंदा चालावा आणि खरे शिवभक्त वादातच संपावेत यासाठीच हे कारस्थान आहे. बहुजनांनी शिवजयंतीच्या वादचे हे मूळ जाणून आपसातील सर्व मतभेद विसरून सर्वांनी १९ फ़ेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी याचसाठी हा खटाटोप ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! शिवश्री


काय फरक